पैठण पोलिस ठाणे येथे शांतता बैठक पार..
आगामी सण उत्सवसाठी पोलिस प्रशासन सज्ज.
आत्ताच एक्सप्रेस
विशेष प्रतिनिधी / शिवनाथ दौंड/ पैठण तालुक्यात आगामी येणारे सण, उत्सव, रमजान ईद, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुडी पाडवा,व इतर सर्व शांततेत पार पडावे यासाठी पैठण पोलिस ठाणे तर्फे डॉ सिध्देश्वर भोरे उप विभागीय पोलिस अधिकारी पैठण,वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेब कबर वादाचे पुर्ण देशात पडसाद उमटत होते.कारण काही संधी साधू प्रसिद्धीसाठी अती उत्साही राजकिय पुढाऱ्यांनी आपले मुळ कार्य सोडून भलतेच गरळ ओकत हिंदू -मुस्लीम दंगल घडवण्याचा प्रयत्न केला.परंतु समाज जागृत झाले असून नकारात्मक गोष्टी स्वीकारत नाही.समाजात दिवसांदिवस बदल होत चालले आहे.त्यामुळे त्यांचे हे प्रयत्न समाजीक एकता समोर टीकु शकले नाही.आजही खुलताबाद शहरात सर्व हिंदू -मुस्लीम व इतर धार्मियांचे लोक सामाजिक सौहार्द पुर्ण मोठ्या गुनागोंविदाने राहत आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख यांनी अगदी मोलाचे मार्गदर्शन केले.नागरीकांनी नको त्या भानगडीत पडू नये.फेसबुक व्हाटसाप,व इतर इंटरनेट चे जपुन वापर करावे, समाजीक तेड, आक्षेपार्ह पोष्ट, कमेंट, किंवा अशांतता निर्माण होईल असे कृत्य करू नये.सायबर विभागाची चोवीस तास पेट्रोलिंग चालू आहे. तसेच प्रत्येक व्हाटसाप ग्रृपमध्ये अनोळखी नावाने आमचे पोलिस कर्मचारी समाविष्ट आहे.त्यामुळे आम्हाला तात्काळ खबर मिळेल व असे गैर कृत्य करण्यास कायदेविषयक कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.तर बाल गुन्हेगार असलेल्यास त्यांचा पालकांवर कारवाई केली जाईल कारण ते पुर्नता जबाबदार आहे. आपल्या अज्ञात पाल्याच्या कृत्यस त्यामुळे पालकांनी आपली जबाबदारी ओळखावी.
तसेच व्हाटसाप ग्रुपमध्ये गैरकृत्य आढळल्यास ग्रुप अडमीनला जबाबदार ठरवून कारवाई केली जाईल. व काही ठिकाणी या कबरीचे वादाने सामाजिक अशांतता पसरली होती.या घटनेची पडताळणी इतर ठिकाणी घडु नये व पैठण शहरात व ग्रामीणमध्ये त्याचे पडसाद उमटुनये म्हणून कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड,मा.अप्पर पोलिस अधीक्षक आयपीएस अन्नपूर्णा सिंह, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण).उप विभागीय अधिकारी डॉ सिध्देश्वर भोरे पैठण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
बैठकीला पैठण पोलिस ठाणे हद्दीतील सर्व माजी नगरसेवक,
सर्व पोलिस पाटील, पत्रकार, सर्व मौलवी, सर्व मंदीराचे पुजारी,सिम विक्रेते, सर्व व्यापारी, सर्व जयंती उत्सव आयोजक, सर्व सरपंच उपसरपंच व पोलीस अधिकारी सहा.पोनि सिध्देश्वर गोरे,उपपोनि मदने,दशरथ बुरुकुल, नागरगोजे,
गोपनीय शाखेचे कर्मचारी मनोज वैद्य, दिलवाले,पोलिस अंमलदार दांडगे,ढाकणे,अंधारे,माळी,गायके पठाण,शेख,आट्टोळे,ओव्हाळ,पुरी,भागिले,दूबाले,खिळे,शिंदे,पवार,चेडे,ठोकळ, पवार,तांबे,राजु कोटलवार,सह होमगार्ड व असंख्य कर्मचारी हजर होते.