पहलगाम काश्मीर येथील दहशतवादी हल्याच्या निषेधार्थ पैठण शहर कडकडीत बंद
पैठण/ प्रतिनिधी/पैठण येथील व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून पहलगम येथे झालेल्या हल्याचा पाकिस्तान मुर्दाबाद चा नारा देऊन निषेध नोंदवला
पहलगाम काश्मीर येथे दहशतवादी भ्याड हल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज पैठणच्या वतीने पैठण बसस्थानक चौकात दहशतवाद्यांचा निषेध करून या घटनेत मृत्युमुखी झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पैठण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. जम्मू काश्मीर येथे गेलेल्या पर्यटकांना पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी नाव धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची देशभरात संतापाची लाट उसळली असुन या घटनेचा ठिक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे. पैठण शहरातील हिंदू समाजाच्या वतीने दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध शहरातील बसस्थानक चौकात करण्यात आला. व्यापाऱ्यांनी आप आपली दुकाने बंद ठेवले होते. नुसते हिंदु च मेले नाही तर मुस्लीम बांधवही या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा करण्यात आल्या. यावेळी पाकिस्तान चा हात असलेल्या दहशतवादी यांनी हल्ला केला. हिंदू वर सतत हल्ले होत असल्याचे भाषणातून सांगितले. यावेळी अनेकांची भाषणे झाली. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्र गीताने श्रद्धांजली कार्यक्रम संपला. यावेळीप्रशासनाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार घुगे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, छावा संघटनेचे किशोर सदावर्ते, अँड. राजेंद्र गोर्डे, पांडुरंग मोरे, के. बु. पठाडे, सुरेश संचेती, डॉ. राजकुमार रोहरा, योगराज बुंदिले, शाम पंजवानी, मनोज लोहारे, चंदन सोनारे, डॉ. शैलेश घोडके, डॉ. संजय खराद, सतिष आहेर, लहु आर्थक, महेश परदेशी, प्रदिप शिंदे, महावीर जैन, सोमनाथ परळकर, दत्तात्रय काळे, धनंजय महाजन, बदाम दसपुते, शहादेव लोहारे, रेखाताई कुलकर्णी, राखी परदेशी, लक्ष्मीकांत पसारे, देविदास शेळके, संतोष कांदवणे, बाळासाहेब मुंदडा, चाँद भाई शेख अदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
