Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबाद"जागतिक एड्स दिन निमित्त पी.एम.श्री जि.प.प्रशाला जाफ्राबाद शाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न."

“जागतिक एड्स दिन निमित्त पी.एम.श्री जि.प.प्रशाला जाफ्राबाद शाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.”

“जागतिक एड्स दिन निमित्त पी.एम.श्री जि.प.प्रशाला जाफ्राबाद शाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.”
जाफ्राबाद/प्रतिनिधी/  पी.एम.श्री जि.प.प्रशाला जाफ्राबाद येथे बुधवार दि.03 डिसेंबर 2025 रोजी “1 डिसेंबर 2025 जागतिक एड्स दिन सप्ताह निमित्त” पी.एम.श्री जि.प.प्रशाला जाफ्राबाद येथे विद्यार्थ्यांना एड्स या आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.एड्स हा आजार कशामुळे होतो त्यासाठी आपण काय काळजी घ्यावी तसेच सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे.एड्स म्हणजे काय ? एड्स होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी. आरोग्य शिक्षण,एड्स होण्याची काय कारणे आहेत त्यामुळे एड्स बद्दल समाजात योग्य माहीती पोहोचावी गैरसमज दूर व्हावेत आणि प्रतिबंधाबाबत जनजागृती व्हावी,यासाठी दरवर्षी १ डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.एड्स झाल्यावर किती दिवसात समजते या सर्व बाबींवर शालेय विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत एड्स सारख्या गंभीर आजाराविषयी आरोग्याबाबतीत उपाय योजना
लक्षणे असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालय जाफराबाद येथील किशोरी समुपदेशक श्री.सागर दांडगे व प्राथमिक आरोग्य केंद्र खासगाव येथील आरोग्य पर्यवेक्षक श्री.राजू खंडागळे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री उमेश दुनगहू यांनी HIV बद्दल पोषक आहार ,वैयक्तिक स्वच्छता , घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले.
    यावेळी आरोग्य सेविका श्रीमती.लता भिसे,श्रीमती.तुळसा भोपळे यांनी ही विद्यार्थ्यांना माहिती दिली.यावेळी आरोग्य सेविक श्री.दमुता जंजाळ, श्री.विशाल कऱ्हाडे,श्री.परसराम जेऊघाले शिक्षिका बाललक्ष्मी पेद्दी ,शिक्षक शिवहरी ढाकणे,शिवाजी देशमुख,अंकुश इंगळे,विजय वानरे,ओम देशमुख,संजय केवट,विष्णू मुनेमानिक,सुनिता नागरे,नंदाबाई चुंगडा उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमेश दुनगहू सर हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बळीराम उबरहंडे यांनी केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments