Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादऑपरेशन सिंदूर: वैजापुरात नागरिकांनी केला जल्लोष

ऑपरेशन सिंदूर: वैजापुरात नागरिकांनी केला जल्लोष

ऑपरेशन सिंदूर: वैजापुरात नागरिकांनी केला जल्लोष

वैजापूर /प्रतिनिधी /पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात निष्पाप २८ पर्यटकांचा जीव गेला होता. याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राइक करत बुधवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदुर राबवलं. पाकिस्तानातील नऊ ठिकाणी असलेले दहशतवाद्यांचे तळ भारताने उध्वस्त करत आतंकवादाचा कंबरड मोडल. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या या चोख प्रत्युत्तराच नागरिकांकडून स्वागत करण्यात आल. वैजापूर शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास एकत्र येत हिंदू मुस्लिम बांधवांनी तिरंगा हातात घेत भारत माता की जय, जय हिंद अशा गगनभेदी घोषणा देत जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, संजय बोरणारे, अकील शेख, मज्जिद कुरेशी,नारायण कवडे, दिनेश राजपूत, जुबेर चाऊस, शैलेश चव्हाण, शैलेश पोंदे, दामोदर पारिक, अमीर आली, पारस घाटे, राजेश गायकवाड, राजेंद्र मुळे, गिरीश चापानेरकर, प्रेम राजपूत, प्रशांत कंगले, वाहेद पठाण, अकील कुरेशी, पत्रकार रियाजुद्दीन शेख, गौरव दौडे, गुलाम काकर, एराज शेख , कल्याण काळे, संकेत वाणी यांच्यासह असंख्य हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments