ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी.आमदार सौ.संजना जाधवांची मागणी
कन्नड/ मराठवाड्यासह कन्नड- सोयगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सततच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेली पिके पूर्णपणे उध्वस्त झाली असून शेतकऱ्री राजा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. या पडलेल्या पावसाने मुक्या जनावरांचे चारे, पशुधनाची हानी तसेच घरांचेही नुकसान झाले आहे.तसेच नदीकाठच्या जमिनी देखील खरडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबियांत चिंता व नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर *राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे व कृषिमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांची आमदार सौ.संजनाताई जाधवांनी भेट घेऊन मराठवाड्या सह कन्नड- सोयगाव मतदार संघ ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा व शेतकरी बांधवांना भरघोस आर्थिक मदतीचा हात द्यावा म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली आहे.या केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे व कृषिमंत्री ना.दत्तात्रय भरनेंनी सकारात्मकता प्रतिसाद दाखवून शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शासना कडुन पुढील योग्य तो निर्णय तात्काळ घेतला जाईल असे आश्वासित केले आहे.