Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादजातीअंतानेच होईल सत्यशोधक समाजाची निर्मिती ; प्रा. नूतन माळवी

जातीअंतानेच होईल सत्यशोधक समाजाची निर्मिती ; प्रा. नूतन माळवी

जातीअंतानेच होईल सत्यशोधक समाजाची निर्मिती ; प्रा. नूतन माळवी

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी/  जातीच्या अस्मिता बळकट होत चालल्यामुळे अन्याय अन्यायाविरोधात एकत्रित येणे बंद चालले होत आहे, शाळा महाविद्यालयांमध्ये जाती नष्ट होण्याऐवजी त्या बळकट होताना दिसत आहेत.  सत्यशोधक समाजाच्या निर्मितीकरिता जातीअंत आवश्यक असून जातीच्या पलीकडे जाऊन सकल समाजाच्या उन्नतीसाठी भूमिका घेऊन काम करण्याची गरज असून  जातीअंतशिवाय सत्यशोधक समाजाची निर्मिती अशक्य असल्याचे प्रतिपादन सत्यशोधक महिला अभ्यासक प्रा. नूतन माळवी (वर्धा) यांनी केले. त्या सत्यशोधक समाज प्रतिष्ठानतर्फे सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त “सत्यशोधक समाज आणि आजचे वास्तव” या विषयावर (दि. २4 सप्टेंबर २०२५ रोजी) मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमातून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती डी. आर. शेळके (सत्यशोधक समाज कार्यकर्ते) हे होते. विचारमंचावर प्रा. वासुदेव मुलाटे, साथी सुभाष लोमटे, कॉ. भीमराव बनसोड, ॲड. रमेशभाई खंडागळे, ग. ह. राठोड, विजयभाऊ पाथ्रीकर, त्र्यंबक पाथ्रीकर, बी. के. आदमाने, सुभेदार सुखदेव बन आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. माळवी म्हणाल्या की,एका जातीचा लढा पुढे नेणे हा आरएसएसचा अजेंडा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख हे सत्यशोधक होते, त्यांनी त्यावेळी आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिका स्वीकारली गेली नसल्याने आज आंदोलनाची वेळ आली आहे. महात्मा फुलेंचा आसूड उगारण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागेल, याचे आत्मचिंतन फुले आंबेडकरवाद्यांनी करण्याची गरज आहे.
प्रा. वासुदेव मुलाटे बोलताना म्हणाले की, महात्मा फुलेंच्या नावाचा केवळ राजकारणासाठी, खुर्ची वाचविण्यासाठी होतोय त्यांचे विचार पायदळी तुडविण्याचे काम सर्हासपणे सुरू आहे. शिक्षणाचे सुरू केलेले बाजारीकरण व खाजगीकरण हा महात्मा फुलेंच्या विचाराशी द्रोह आहे. ॲड. डी. आर. शेळके म्हणाले की, फुले – शाहू-आंबेडकर महाराष्ट्राने आजही स्वीकारलेले नाहीत, संविधान बदलण्याची जय्यत तयारी सुरू असून कोणत्याही क्षणी मनुस्मृतीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे, हे थांबविण्यासाठी सर्वांनी सामर्थ्याने विरोध करावा लागेल तेव्हाच ही धर्मांध व्यवस्था उलथून टाकता येईल. प्रास्ताविक सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. के. ई. हरिदास यांनी केले, सूत्रसंचालन ॲड. वैशाली डोळस यांनी केले आभार रतनकुमार साळवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. भारत शिरसाट, इंजि. चेतन राऊत, अनंत भवरे, इजि. महेश निनाळे, सविता अभ्यंकर, जयप्रकाश हरिदास, अमरदीप वानखडे, जितेंद्र भवरे डॉ. अरुण कांबळे, डॉ. सविता लोंढे, रामदास अभ्यंकर, रमेशचंद्र धनेगावकर, डॉ. अविनाश अंकुशराव, जनार्दन कपूरे, राजन कीर्तने, बाबुराव गवई, प्रभाकर आरसूड, सुनील वायसळ, आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments