निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटला;-घोसला शिवारात खट काळीचे पुराच्या पाण्यात पिके शेतीसह वाहून गेले
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ सोयगाव तालुक्यातील जरंडी मंडळात जरंडी सह निमखेडी ,घोसला शिवारात सोमवारी रात्री झालेल्या ढगफुटी च्या पावसाने निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटला मुळे सांडव्याचे पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने तब्बल निमखेडी शिवारातील सहाशे एकरवर कपाशीची पिके वाहून गेली असून घोसल्या च्या खटकाळी नदीच्या पात्राने रुद्रावतार घेतल्या मुळे ७५ शेतकऱ्यांची शेती पिकांसह खरडून वाहून गेली आहे यामध्ये सुधाकर युवरे,श्रावण युवरे,दरम्यान निमखेडी शिवारात सांडव्याच्या पुरात अंकुश पांडे यांची तीन शेळ्या व एक बैल घोसल्यात दीपक सुभाष गवळी यांचे चार जनावरे नाल्याच्या पूरात वाहून गेले आहेत दरम्यान घोसला शिवारात ढगफुटी च्या पावसानेही कपाशी चे नुकसान झाले असून, घोसला शिवारात शंभर टक्के नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने जलसंधारण विभागाचे अभियंता सूर्यकांत निकम् यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे दरम्यान घोसल्या च्या खटकाल नदीच्या पुलावरून पाणी वाहून शेतात शिरून पिके वाहून गेले त्यामुळे पिके वाहून गेले आहेत मृत जनावरांवर पशुसंवर्धन विभागाचे डॉ दानिश बुखारी यांनी शवविच्छेदन केले आहे उमर विहिरे गावालगत असलेल्या नाल्याच्या पूराचे पाणी शेतात शिरले त्यामुळे उमर विहिरे परिसराला पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान घोसला गावात बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानी ची तहसीलदार मनीषा मेने, तालुका कृषी अधिकारी भारत कासार यांचेसह कृषी, महसूल च्या पथकाने पाहणी केली आहे..
चौकट;-कडे वडगावच्या पुरात गावात पाणी शिरले
दरम्यान सोयगाव-चाळीसगाव रस्त्याच्या लगत असलेल्या कडे वडगावच्या नाल्या च्या पूराचे पाणी घरात शिरुन नुकसान झाले आहे या पूरात एक घोडा वाहून आला आहे
चौकट;-घोसला गावात चूल पेटली नाही
दरम्यान घोसला गावात सहशे च्या वर शेतकऱ्यांचे हाती येणारे कपाशी पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते त्यामुळे घोसला गावात चूल पेटली नव्हती असे बाधित शेतकरी सुनील अरुण पाटील यांनी सांगितले.