वाळवा तालुक्यातील माजी सहकार सहायक निबंधक अरर्जूनराव खैरमोडे यांचे वृद्धापकाळाने निधन
इस्लामपूर/प्रतिनिधी/ इकबाल पीरजादे इस्लामपूर येथील अर्जुन चंद्राप्पा खैरमोडे (वय 82) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सहकार विभागातील अभ्यासक म्हणून त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होता. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांनी सहकार विभागात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था म्हणून सेवा बजावली आहे. सहकार क्षेत्रातील बँक पतसंस्था येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांची नियुक्ती केली होती. मुळगाव चिकुर्डे (जि. सांगली) असून त्यांच्या मागे मुलगा, पाच मुली, जावई,सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२९) सकाळी नऊ वाजता उरुण इस्लामपूर येथील स्मशानभूमीत होईल.