न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात तब्बल करोडोंची रोकड,हे चाल्लय तरी काय!
न्या.यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी लागलेली आग विझविण्यात आल्यानंतर एका खोलीत मोठ्या प्रमाणात करोडोंची रोख रक्कम सापडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू केली व त्यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला.दिनांक १४ मार्च २०२५ ला न्या.वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी आग लागल्यानंतर ताबडतोब कुटुंबीयांनी अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली.परंतु आग विझवल्यानंतर पोलिसांना एका खोलीत अंदाजे १५ करोड रुपये सापडल्याचे वृत्त समोर येताच न्यायपालिका क्षेत्रात मोठी खळबळ उडाली.यावर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमकडून सावसावर करण्यात आली व न्या.वर्मा यांची पुन्हा अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशनने या निर्णयाला तिव्र विरोध दर्शवत म्हणाले की,”आमचे न्यायालय म्हणजे कचरा पेटी नाही”अशी प्रखर प्रतिक्रिया बार असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली.न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात ऐवढी मोठी रोकड सापडने म्हणजे न्यायव्यवस्थेला व समाजाला अंधारात ठेवून देशाची दिशाभूल करण्याचे काम वर्मांनी केले. त्यांना कोणत्याही स्तरातुन माफी नको.आज देशात बेरोजगारी, महागाई,भुकमरी सारख्या अत्यंत गंभीर व मोठ्या समस्या समोर असतांना देशाचा जबाबदार व्यक्ती करोडो रुपये वाममार्गाने किंवा अन्य मार्गाने कमवितो मग सर्वसामान्यांनी काय करावे!असाही प्रश्न उपस्थित होतो.त्यामुळे आता प्रश्न निर्माण झाला आहे की एवढा पैसा आलाच कोठुन!वर्माच्या उघडकीस आलेल्या या करोडो रुपयांवरून सिध्द होते की वर्मा न्यायदेवतेची अवमानना करून चुकीच्या मार्गाने पैसा कमवित असावेत. कारण आजच्या परिस्थितीत अपराधातुन किंवा गुन्हेगारीतुन मुक्ती मिळावी यासाठी खालुन तर वर्तीपर्यंत पैसे द्यावे लागतात असे म्हटल्या जाते.त्यातलेचे वर्मा असावेत ज्यांनी पैशासाठी अनेकांचा बळी घेतला असावा यालाही नाकारता येत नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी आग लागल्याच्या घटनेत स्टोअर रूममध्ये प्रचंड रक्कम नोटांच्या स्वरूपात सापडल्यानंतर खळबळ उडाली असतांनाच आता घराच्या आवारातही अर्धवट जळालेल्या नोटा सापडल्याने या अग्निकांडातील संशयाची धग आणखीनच वाढली आहे.या संपूर्ण घटनेवरून स्पष्ट होते की वर्माने कायद्याचे उल्लंघन करून वाममार्गाने किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवित असावेत.त्यांची जागा आता न्यायालयात नसुन पोलिस कोठडीत असायला पाहिजे.माननीय सरन्यायाधीश न्या.वर्मा यांना राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगितले जाऊ शकते असे वर्तविण्यात येत आहे.परंतु माननीय सरन्यायाधीशांनी असे न करता सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी. कारण एखाद्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या घरात एवढी मोठी रोख रक्कम सापडने लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर व धक्कादायक बाब आहे. त्यामुळे वर्मानी गुन्हा केला असेल तर त्यांच्यावर सर्वसामान्याप्रमाणे कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.अचानक त्यांच्या अधिकृत निवासस्थानी आग लागावी आणि त्यांचे काळे कारणामे व अवैध रोकड अचानक सामोरं यावी अशी घटना घडली.सरकारने अशांवर फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून कारवाई करून ताबडतोब कठोर शिक्षा करावी आणि अधिकृत निवासस्थानी फक्त १५ करोडच सापडले बाकी अनेक ठिकाणी वर्मांनी पैसा लपवून ठेवले असावेत किंवा गुंतविले असावेत यालाही नाकारता येत नाही.त्यामुळे आजच्या परिस्थितीत वर्मा करोडोचा धनी नसुन अरबो रूपयांचा धनी असल्याचे त्यांच्या चुकीच्या कारनाम्यावरून लक्षात येते.आजच्या परिस्थितीत यशवंत वर्मा सारखे लोक न्यायपालिकेसाठी मोठा धब्बा आहे असे मला वाटते.कारण अधिकृत निवासस्थानी जळलेल्या नोटांचे बंडल आढळल्याचा व्हिडिओ सुध्दा प्रस्तुत झाला,यात आता काहीच लपण्यालायक किंवा संशयास्पद नाही.न्या.वर्मा यांच्या निवासस्थानी कथितरित्या सापडलेल्या मोठ्या प्रमाणातील रोख रकमेबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आपला २५ पानी चौकशी अहवाल सरन्यायाधीशांना सादर केला.या संपूर्ण घटनेवरून यशवंत वर्मा न्यायपालिकेचे मोठे अपराधी आहेत हे सिद्ध होते. सरन्यायाधीशांकडुन चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.परंतु माझ्या मते चौकशी करीता कोणत्याही प्रकारच्या समितीची गरज नसावी. कारण जळलेल्या नोटांचा व्हिडिओ पोलिसांकडून प्रस्तुत झालेला आहे.त्याचप्रमाणे सोशल मीडियावर,न्युज चॅनलवर सुध्दा व्हायरल झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून यशवंत वर्मा यांच्यावर कठोर कारवाई करावी. कारण कायदाच सांगतो की गुन्हेगारांना माफी नाहीच त्याच आधारे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार)

