Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादमराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणारा रेल्वे मार्ग _

मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणारा रेल्वे मार्ग _

मराठवाड्याच्या विकासाला नवी दिशा देणारा रेल्वे मार्ग _
 जालना केंद्रस्थानी ‘पूर्व-पश्चिम’ आणि ‘उत्तर-दक्षिण’ जोडणीचे स्वप्न साकार होण्याची गरज : डॉ. संजय लाखे पाटील
जालना/प्रतिनिधी/ राज्याच्या पायाभूत विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या अनेक निर्णयांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आजच्या  मंत्रिमंडळ बैठकीतील  मराठवाड्यासाठी अपवादाने  उल्लेखनीय असलेला आणि स्वागतार्ह असलेला असा निर्णय म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेला ‘सोलापूर–तुळजापूर–धाराशिव या नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या सुधारित खर्चाला आणि राज्य शासनाच्या ५० टक्के निधी हिश्श्यास मान्यता देण्याचा निर्णय आहे.!’  हा निर्णय मराठवाड्याच्या रेल्वे दळणवळण व्यवस्थेतील
आणि विकासासाठी नव्या पर्वाची सुरुवात ठरू शकतात परंतु त्यासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे प्रस्तावित रेल्वेमार्ग खामगाव–जालना–धाराशिव आणि जळगाव–जालना– धाराशिव. हे दोन्ही मार्ग मंजूर झाल्यास जालना  आणि बिड हे  ‘पूर्व-पश्चिम’ आणि ‘उत्तर-दक्षिण’ भारत जोडणारे रेल्वे जंक्शन म्हणून उदयास येतील . यामुळे अविकसित भागास अश्या मराठवाडा आणि विदर्भातील व-हाड प्रांताचा  विकासाचा वेग अनेकपटींनी वाढेल, असे मत मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंच संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखेपाटील यांनी व्यक्त केले आहे.
जालना हे भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्राच्या मध्यभागी स्थित असून, सध्या विदर्भातील खामगाव आणि  खान्देश मधील जळगाव व मराठवाड्यातील  धाराशिव पुढे सोलापूर  दक्षीण भारत या दरम्यानचा रेल्वे दुवा तुटलेला आहे. या मार्गाची निर्मिती झाल्यास औद्योगिक वाहतूक, कृषी उत्पादनांचा पुरवठा आणि पर्यटन, धार्मिक पर्यटन विशेषतः शेगाव तुळजापूर पंढरपूर येरमाळा ही पवित्र क्षेत्र या सर्वांवर सकारात्मक परिणाम होईल. विशेषतः धाराशिव–तुळजापूर–सोलापूर मार्गाच्या मंजुरीनंतर, आता खामगाव–जालना–धाराशिव
आणि  जळगाव जालना या मंजूर असलेल्या रेल्वे मार्गाचा पुढे बिड ( आणि धाराशिव) अशी जोडणी झाली आणि  ही लाईन सुरू झाल्यास शेगाव (खामगाव) धाराशिव (तुळजापूर/पंढरपूर) आणि पुढे दक्षीण भारतात बेंगळुरू मद्रास केरळ हा मार्ग प्रशस्त होईल आणि संपूर्ण मराठवाडा हा देशाच्या रेल्वेमार्गावर दिल्ली बेंगळुरू मद्रास आणि मुंबई पुणे विशाखापट्टणम असा जोडला जाईल आणि विकासाचे , रोजगार आणि उद्योगाचे नवे पर्व सुरू होईल यासाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय खासदारांनी पुढाकार घेणे आवश्यक असून त्यासाठी मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंच च्या वतीने प्रयत्न केले जातील असेही डॉ संजय लाखेपाटील यांनी सांगितले आहे
डॉ. संजय लाखेपाटील म्हणाले, मराठवाड्याच्या अनुशेषावर केवळ चर्चा पुरेशी नाही. आता कृती आणि जनतेचा दबाव या दोनच गोष्टी निर्णायक ठरतील. सर्वपक्षीय खासदारांनी ‘मातीशी इमान राखून’ संसदेत हा प्रश्न प्राधान्याने मांडावा. तसेच या रेल्वे मार्गासाठी जनजागृती, पाठपुरावा आणि तीव्र आंदोलने उभी राहिली पाहिजेत. त्यांनी पुढे सांगितले की, राज्य आणि केंद्र शासनाने जर हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला, तर जालना आणि बिड हे रेल्वे नकाशावर ‘विकासाचे नव केंद्र’ ठरतील.
रेल्वे जोडणीचे फायदे अशी आहे की,  औद्योगिक गुंतवणुकीस चालना – जालना, बिड, धाराशिव आणि खामगाव येथील औद्योगिक वसाहतींना थेट बाजारपेठांशी जोडणी. कृषी व फलोत्पादन निर्यात वाढ – शेतकऱ्यांचे मालवाहतूक खर्च कमी होऊन स्पर्धात्मक दरात विक्री. पर्यटनाला गती – तुळजाभवानी, औंढा नागनाथ, पैठण, अजिंठा-वेरूळ अशा धार्मिक व ऐतिहासिक स्थळांपर्यंत सहज पोहोच. रोजगार निर्मिती – बांधकाम काळात तसेच रेल्वे सुरू झाल्यानंतर हजारो रोजगार निर्मितीची शक्यता. सामाजिक-सांस्कृतिक एकात्मता – उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ यांना जोडणारा विकासाचा सेतू. त्यामुळे सरकार आणि खासदारांकडून ठोस पाऊले अपेक्षित असल्याचे मत असल्याचे मत डॉ. लाखे पाटील यांनी व्यक्त केले.
फडणवीस सरकारने सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे प्रकल्पाला ज्या तत्परतेने मान्यता दिली, त्याच धर्तीवर खामगाव–जालना–धाराशिव आणि जळगाव–जालना–धाराशिव मार्गांचे सर्वेक्षण व मंजुरी प्रक्रियाही गतीमान करावी, अशी मागणी ‘मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंच’तर्फे करण्यात आली आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास मराठवाड्याचा अनुशेष केवळ इतिहासजमा होणार नाही, तर जालना ‘महाराष्ट्राचे रेल्वे हृदय’ म्हणून उदयास येईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments