भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे नवनियुक्त ACP सागर देशमुख यांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर : शहर विभागाचे नवीन सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) सागर देशमुख यांनी नुकतेच पदभार स्वीकारला असून, त्यांच्या स्वागतासाठी भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष क्राईम रिपोर्ट अलीम बेग यांच्या वतीने सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी समाजसेवक सय्यद अशफाक अली (भडकल गेट), रोमी खान, चेतन जंगले आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी सागर देशमुख यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी अलीम बेग म्हणाले, “सागर देशमुख हे तरुण व कर्तृत्ववान अधिकारी असून शहरात चांगले काम करतील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
नवीन ACP सागर देशमुख यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.