नवनिर्वाचित वनपारिक्षेत्र अधिकारी श्री.टोणपेंच्या धडक कार्यवाईने दोघा ट्रॅक्टर वर गुन्हे
कन्नड/ कन्नड वन परिक्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून परिसरातील अनेक जण अतिक्रमण करून जमीन बळकवीण्याच्या घटना सतत घडत असतांनाची कुणकुण नुकतेच रुजु झालेले वन परिक्षेत्र अधिकारी श्री. शिवाजी टोणपे यांना लागताच त्यांनी सदर क्षेत्रात रात्रीची गस्त वाढवून वन जमिनीवर अतिक्रमण करून नगरणी करणारे दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे.
दि.17 जुनच्या मध्यरात्री ते वन क्षेत्र परिसरात गस्त घालत असता मौजे रेल -नावडी राखीव वनात अतिक्रमण करून नांगरणी करीत असलेली दोन ट्रॅक्टर त्यांना आढळून आले.क्षणाचाही विलंब न करिता त्यांनी त्या दोन्हीही ट्रॅक्टर वर धडक कार्यवाई करून ती जप्त केली,व त्यावर गुन्ह्याची नोंदही केली.त्यांच्या या धडक कार्यवाईचे सर्वत्र कौतुक होत असुन आज पर्यंत चिरीमिरी घेऊन वन विभागात अतिक्रमण करणाऱ्यांकडे जाणून- बुजून दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी वर्गाची झोप मात्र नक्किच उडाली असेल यात कुठलीही शंका नाही.
या धडक कार्यवाई छ.संभाजीनगर जिल्ह्याचे वन- संवरक्षक श्री.लकरा,उपवनसंवरक्षक श्रीमती माने,सहाय्यक वन -संवरक्षक (रोहयो व कॅम्पा ) कन्नड विभागाचे श्री.चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली हा सापळा रचून श्री.टोणपे यांनी ही धडक कार्यवाई केली आहे.या वेळी त्यांचे सोबत वनरक्षक यु.एस.सोनावणे,वनपाल के.आर.जाधव,ए ए.एल.नगरगोजे,बी.एस.चव्हाण,एच,के.वाघ,एम.बी.पेरके,एस.एस.लांडे,वन सेवक अशोक आव्हाड व नारायण पवार सोबत होते.