नाथ षेष्ठी यात्रेस लागले ग्रहण,न.प.ने लावले रहाटपाळण्याला शिल
पैठण/प्रतिनिधी/बबन उदावंत / महाराष्ट्रातील सर्वात मोठी दुसर्या क्रमांकाची यात्रा म्हणून ओळखली जाणारी पैठण येथील नाथषेष्टी यात्रा कडे पाहीले जाते. या षष्ठी यात्रेत गेल्या शेकडो वर्षापासून बच्चे अबाल वृद्धासाठी पुर्वीपासून ‘रहाटपाळणा’ येतो ईथे पंधरा दिवस हि यात्रा चालते ईथे येणाऱ्या रहाटपाळण्याचे म्हणजे षेष्ठीतील मुख्य आकर्षन .परंतु गेल्या काही वर्षांत या रहाटपाळण्याचे अर्थिक राजकारण फिरत असल्याने या वर्षीची नगर परिषदेने यंदा बोली बोलवली या बोलीत प्रथम रहाटपाळणा चालवण्यासाठी तब्बल २७ लाखावर बोली गेली, त्यात पहीला, दुसरा, तिसर्या क्रमांकापैकी कोणीही पैसे भरले नसुन काही दलालांनी रहाटपाळणे कुठल्याही परवानगी न घेता न.प.चा कर बुडवत विनापरवाना सुरू केले होते. यांची उशिरा का होईना पैठण न.प.ने दखल घेत सोमवार दि, २४ रोजी दुपारी २ वाजे दरम्यान न.प.चे कर्मचारी व पोलीस बंदोबस्तात जुने पंप हाऊस परिसरातील विनापरवाना रहाटपाळणे व मनोरंजनाचे साधने लावले असल्यामुळे सदर साधने सिल (बंद) पैठण न.प ने केले आहे. तसेच न.प.च्या वतीने अवाहन करण्यात आले कि या धोकादायक रहाटपाळणे व ईतर साधने न.प.च्या परवानगी शिवाय कोणीही उघड्डु किंवा वाफरण्यास बंदी केली आहे.