Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादनांदेड – बंगलोर एक्स्प्रेस काही दिवस नांदेड - यशवंतपूर - नांदेड  अशी...

नांदेड – बंगलोर एक्स्प्रेस काही दिवस नांदेड – यशवंतपूर – नांदेड  अशी धावणार

नांदेड – बंगलोर एक्स्प्रेस काही दिवस नांदेड – यशवंतपूर – नांदेड  अशी धावणार

बेंगलोर स्थानकातील  पिट लाईन क्रमांक 03 ची कॅमटेक डिझाइननुसार कॅटवॉकसह पुनर्बांधणी करण्यात येणार आहे, यामुळे दिनांक 15.08.2025 ते 15.01.2026 पर्यंत 153 दिवसांसाठी पिट लाईन क्रमांक 03 आणि स्टेबलिंग लाईन क्रमांक 05 च्या वापरावर निर्बंध घालण्यात आला आहे.

या निर्बंधामुळे हजूर साहिब नांदेड – बंगलोर-हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस वरील कालावधीत नांदेड- यशवंतपूर -नांदेड अशी धावेल. ते पुढील प्रमाणे :

1.गाडी क्रमांक 16594 हजूर साहिब नांदेड – बेंगलोर एक्स्प्रेस दिनांक 15.08.2025 ते 15.01.2026 पर्यंत 153 दिवसांसाठी हजूर साहिब नांदेड – यशवंतपूर अशी धावेल, हि गाडी यशवंतपूर येथे  सकाळी 04.15 वाजता पोहोचेल. या कालावधीत  बेंगलोर केंट आणि  बेंगलोर येथील थांबे वगळण्यात आले आहे.

2.गाडी क्रमांक 16593 बेंगलोर – हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस दिनांक 16.08.2025 ते 16.01.2026 पर्यंत 153 दिवसांसाठी यशवंतपूर येथून रात्री 23.55 वाजता सुटेल आणि यशवंतपूर – हजूर साहिब नांदेड अशी धावेल.  या कालावधीत बेंगलोर आणि बेंगलोर केंट येथील थांबे वगळण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments