नांदा गाव सस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे; चौकशीची मागणी ….!
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव /प्रतिनिधी /रस्त्याची कामे करताना राजकीय वरदहस्तात खडीकरण न करताच काळा ऑइल टाकून डांबरीकरण करण्यात आले. यामुळे जागोजागी हे डांबरीकरण उखळून रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी कार्यकारी अभियंता सा.बा. बांधकाम विभाग यांना करण्यात आली आहे.
सोयगाव तालुक्यातील नांदा गाव परिसरात अजिंठा पर्वत रांगेतील डोंगराळ भाग असून बंजारा आदिवासी बहूल वस्ती च्या नागरिकांसाठी नांदा हे गाव तालुक्यास व जिल्हासाठी मार्ग सोईस्कर व्हावा गाव खेड्यांचा सुध्दा विकास व्हावा उद्दांत हेतू शासाचा असुन गेल्या पन्नास वर्षांनंतर रस्ता मंजूर झाला आहे. रस्ता तयार करतांना अगोदर रस्त्याचे खडीकरण आवश्यक असतांना. त्यानंतर त्यावर डांबरीकरण करण्यात येते असते. डांबरीकरण करतांनाही त्यावर काळा ऑइल पसरविले आहे. त्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी उखडत आहे. सदर रस्त्याचे बांधकामावर कोटयावधी रुपयाचा निधी खर्च होऊनही दर्जाहीन व बोगस पध्दतीने काम ठेकेदारांच्या हुकूमशही पध्दतीने करण्यात येत आहे. या कामाची चौकशी क्वालीटी कंट्रोल मार्फत व्हावी अशी मागणी पुढे येत आहे. रस्त्यांचे काम करित असतांना कामावर जबाबदार कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अधिकारी, गुप्तेदार हजर न राहता यांचे गैरहजरित मुकादम मार्फत मजुरांकडून अल्प मजूरी देऊन करवून घेतली जात आहे. मात्र वरिष्ठ अधिकारी सुध्दा चौकशी करण्वयास धज्जावत नाही. अखेर या चांडाळ चौकडीना कोणत्या राजकिय पुढाऱ्याचा वरदहस्त आहे हे कोढ उलगडलेल नाही.
घोटाळेबाज कंत्राटदाराचे देयक येण्यापुर्वी या गंभिर प्रश्नाकडे लक्ष देवून या कामांची चौकशी करण्याची मागणी नरेंद्रसिंग राजपूत, रवींद्र पाटील, मंगलसिंग पाटील., नितीन पाटील, मनोहर पाटील, महेंद्र पाटील, रमेश पाटील . किशोर पाटील..
यांनी केली आहे.