नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा दोन  योजनेचा प्रेरणादायी शुभारंभ

0
74

नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प टप्पा दोन  योजनेचा प्रेरणादायी शुभारंभ

खुलताबाद/ प्रतिनिधी /खुलताबाद तालुक्यातील पळसवाडी गावामध्ये नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प  टप्पा दोन अंतर्गत योजनांचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला.या प्रसंगी  कृषी मंडळ अधिकारी किशोर पाडळे यांनी शेतकऱ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यानंतर गावामध्ये मशाल दिंडी काढण्यात आली, ज्यामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला.जिल्हा परिषद शाळा तालुका कृषी अधिकारी अंतर्गत व नाथ माध्यमिक विद्यालय,तसेच मुख्याध्यापक संतोष जगताप,शिक्षिका, अनुराधा कांबळे, ज्योती शिंदे,प्रियंका जाधव, सारिका नागे आणि नाथ माध्यमिक विद्यालयाचे मच्छिंद्र ठेंगडे व कृषी मित्र किशोर जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीत उत्स्फूर्त पणे भाग घेतला.या प्रभात फेरीतून गावात योजनेची जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात संजय धबाले यांनी शेतकऱ्यांना योजना समजावून सांगितली व  या योजनेचा लाभ कसा घ्यायचा,याचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच दगडू धनसिंग भेंडे उपसरपंच सोमीनाथ ठेंगडे,महेश दहिवाल,सीताराम पवार,ग्रामसेवक विनायक पवार. रामदास ठेंगडे.किशोर ठेंगडे, अण्णा काळे, बाळू काळे,कैलास गिरे,जनार्दन ओटे गावातील अनेक प्रगतशील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.