नहार उद्योगसमूहाची गगनभरारी
साग नहार्स आटोटेक इंडिया प्रा.लि. असे या संयुक्त उद्योगाचे नाव असेल. आशिया आणि युरोप खंडातील ग्राहकांना अधिक समर्थपणे उच्च दर्जाची, आकर्षक व विकसित केलेली उत्पादने पुरविणे, हा या उद्योगसमूहांचा एकत्र येण्यामागचा हेतू आहे. यातून नहार समूहाच्या एका नव्या पर्वास प्रारंभ झाला आहे.
आधीच्या उत्पादनांसोबतच इव्ही आणि आयसीई पीव्हीसाठी हायड्रोलिक ट्युब, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड्स व रबर होजेसची निर्मितीही हा उद्योगसमूह करणार आहे.
