Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादज्येष्ठ नागरिकांना आवाहन

ज्येष्ठ नागरिकांना आवाहन

ज्येष्ठ नागरिकांना आवाहन

जालना :-  जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना या दोन्ही योजनेचे सद्यस्थितीत अर्ज स्विकारणे बंद आहे. तरी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून व्हॉटसअपवर बातमी, व्हिडीओ प्रसारीत करुन ज्येष्ठ नागरिकांकडून 100 रुपये प्रत्येक अर्जासाठी शुल्क आकारणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.  सद्यस्थितीत या योजनेसंदर्भात सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना या कार्यालयात कोणतेही अर्ज स्विकारले जात नाहीत. तरी ज्येष्ठ नागरिकांनी होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त राजु एडके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments