नगरपरिषदेच्या सुस्तावलेल्या कारभारामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात
कन्नड /उदय कुलकर्णी/शिवसेना कन्नड चे वतीने दि.8 रोजी नगर परिषदेचे सद्याचे प्रशासकीय अधिकारी तथा तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना एक निवेदन देण्यात आले असुन त्यात शहरात सर्वत्र साचलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.व त्यावर तात्काळ उपाय योजना करावी म्हणून मागणी केली आहे.
सदर दिलेल्या निवेदनात निवेदन कर्त्यांनी असे नमुद केले आहे की,सद्या उन्हाळ्याचे दिवस असुन नागरीक उकाड्याने त्रस्त झाले आहे.त्यात जागोजागी नाल्या नादुरुस्त व कचरा व घाणीने तुडुंब भरल्या आहेत.त्यातून पाण्याचा निस्ततारा होत नसलेमुळे दुर्गंधी सुटली आहे.त्यामुळे डास,माशांचा प्राधुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.त्यातच शहरातही अनेक ठिकाणी कचाऱ्यांचे ढीग पडून आहे.त्यामुळे या नैसर्गिक वरदस्त लाभलेल्या तालूका व शहरास नगर परिषदेने चाललेल्या ढिसाळ कारभारामुळे एक प्रकारे मोठे ग्रहणच लागले आहे की काय! असा प्रश्न नगरवासियांना पडला आहे.दुसरीकडे ए.सीची हवा घेत सुस्तावलेल्या प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्यासाठी तरी जागे होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचू नये यासाठी का! होईना माणुसकीचा धर्म पाळून शहरातील साचलेली घाण तसेच तुंबलेल्या नाल्या साफ कराव्यात एव्हडीच माफक अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच शहरात तात्काळ धुर फवारणी करावी. तसेच शासनाच्या निर्णया नुसार न.प.चे वतीने दिव्यांगांना मिळणारे 5% चे मानधन वीणा रुकावट वितरित करावे अशी मागणी ही सदर निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनावर संतोष पवार, रत्नाकर पंडित, लक्ष्मीकांत सुरे,डॉक्टर सदाशिव पाटील, राम पवार, सलमान शेख, सिद्धार्थ निकाळजे, प्रदीप बोडखे, कैलास जाधव, दीपक दाभाडे, यासीन शेख, आदित्य गर्जे, श्रीराम घुगे, ऋषी चव्हाण, संदीप घोंगटे, प्रकाश काचोळे ई.च्या