Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादनगरपालिका क्षेत्रात "वार्ड भेट समस्या समाधान अभियाना"च्या माध्यमातून विभागीय आयुक्त दिलीप गावडे...

नगरपालिका क्षेत्रात “वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नागरिकांशी संवाद

नगरपालिका क्षेत्रात “वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा नागरिकांशी संवाद

 

Ø  पूर्वी झालेल्या वेबिनारमधून समस्यांचे समाधान झाल्याची नागरिकांची प्रतिक्रिया

Ø 75 नगरपालिकेतून नागरिक थेट सहभागी

छत्रपती संभाजीनगर, :- .प्रधानमंत्री आवास योजना टप्पेनिहाय निधी वेळेवर प्राप्त होत नाही. घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू कमी पडते त्यापेक्षा जास्त वाळू लागल्यास रॉयल्टी भरावी लागते. नाले साफ सफाईची समस्या पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात यावी, नगरपरिषद किंवा नगरपंचायत क्षेत्रातील शेतीलास कृषी योजनेचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येतात, काही बचत गट असे आहेत त्यांना सध्या कर्ज मिळत नाही त्यांचा विचार व्हावा, यासह नागरी क्षेत्रातील नागरिकांना येणाऱ्या अडचणी आज नागरिकांनी थेट विभागीय आयुक्तांसमेार मांडल्या. विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तत्परतेने मार्गी लावण्यासोबतच घरकुल योजनेसाठी पाच ब्रास वाळु मोफत उपलब्ध करून द्यावी, पावसाळा सुरू होत असल्याने शहरातील नालेसफाईचे काम मिशन मोडवर हाती घेऊन महिनाभरात पूर्ण करावे असे निर्देश दिले. नागरिकांना अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कायम सोबत असल्याचा विश्वास विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी दिला. मराठवाड्यातील अनेक नगर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामकाजाबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले.

मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील नागरिक आपल्या वार्डातील अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपालिका क्षेत्रात वार्ड भेट समस्या समाधान अभियाना”च्या माध्यमातून आज पुन्हा संवाद साधला. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातून सह आयुक्त देवीदास टेकाळे  उपस्थित होते.

नागरिकांनी नगरविकास विभागाशी सबंधित योजना, प्रश्न, असलेल्या अडचणी, योजनेच्या अंमलबजावणीचे धोरण तसेच याबाबत असलेल्या अडचणी मांडल्या.

            छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जालना, बदनापूर, परभणी, सेलू, मानवत, गंगाखेड, हिंगोली, कळमनुरी, लातूर, औसा,बीड, गेवराई, नांदेड, लोहा, अर्धापुर, कुंडलवाडी,मुखेड, कंधार येथून चर्चेत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. नागरिकांनी मांडलेल्या अडचणी तातडीने सोडवा, असे निर्देश देत प्रशासन कायम आपल्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी दिला. गेल्या वेळी झालेल्या संवादातील बहुतांश अडचणी मार्गी लागल्या आहेत, काही अडचणी सोडविण्याच्या प्रक्रियेत आहेत, त्या अडचणी देखील लवकरच मार्गी लागतील, असे त्यांनी दिले.

मराठवाड्यातील नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येत शांततेत व शिस्तबद्ध पध्दतीने सहभाग नोंदविल्याबद्दल विभागीय आयुक्त श्री.गावडे यांनी नागरिकांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments