नगर परिषद निवडणुकी निमित्य कन्नड पोलीस दलाचे निघाले धडकीभरो पथसंचलन
कन्नड/ कन्नड न.परिषदेच्या निवडणुकी दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्थेस कुठेही गालबोट लागू नये व निवडणूक निर्भयतेने पार पडावी,या साठी कन्नड पोलीस दलाचे वतीने शहरात धडकीभरो पथसंचलण(रूट मार्च )करण्यात आला.
सदर पथसंचलन ( रूट मार्च )हे शहरातील पोलीस दल कार्यालया पासून सुरु होऊन तहसील कार्यालयाचे मुख्य रस्त्यावरून पुढे महावीर चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,स्वातंत्रवीर लोकमान्य टिळक पुतळा मार्गे पिशोर नाका, सिल्लोड रोड,भारतीय दुरसंचार कार्यालय,करीमनगर,संत रविदासनगर,वडारवाडा,शनी मंदिर,बाबा सिद्दीकी चौक व पुनःच पोलीस दल कार्यालय पर्यंत काढण्यात आला.
या काढण्यात आलेल्या पथसंचलनात ( रूट मार्च) मधे कन्नडचे उप विभागीय अधिकारी श्री.संतोष गोरड,कन्नड पोलीस दलाच्या कर्तव्यदक्ष उप- विभागीय अधिकारी श्रीमती.अपराजीता अग्निहोत्री,शहर पोलीस दल कार्यालयाचे सर्वेसर्वा पोलीस निरीक्षक आर.बी.सानप,ग्रामीण पोलीस दलाचे सर्वेसर्वा सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार,शहर पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक कुणाल सूर्यवंशी,उपनिरीक्षक चांद मेंडके,हेड कॉन्स्टेबल कैलास निभोंरकर,पोलीस दलाचे,संजय आटोळे, कैलास करवंदे,मोईस बेग,या सह दंगल नियंत्रक पथक दल,शहर व ग्रामीण पोलीस दल कार्यालयाचे जवान,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने या धडकीभरो पथसंचलणारत ( रूट मार्च ) मधेसहभागी झाले होते.या शहरात निघालेल्या पथ संचलणाने संपूर्ण कन्नड वासियांचे लक्ष वेधून घेतले होते.