Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादनगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी  यंत्रणा सुसज्ज ठेवा  -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी  यंत्रणा सुसज्ज ठेवा  -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीसाठी  यंत्रणा सुसज्ज ठेवा  -जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 

छत्रपती संभाजीनगर  जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषद मतदान प्रक्रियेसाठी नगरपालिका, पोलीस आणि महसूल या तिन्ही यंत्रणाने योग्य समन्वय ठेवून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक  होण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन  यंत्रणा सुसज्ज ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दूरदृष्टी प्रणालीद्वारे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी,तहसीलदार नगरपालिका मुख्याधिकारी  यांच्याशी ऑनलाइन संवाद साधत निवडणूक यंत्रणेबाबतचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून नगरपालिका मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव उपस्थीत होते. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संगीता राठोड ,पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, कन्नड ,वैजापूर ,पैठण गंगापूर, सिल्लोड या नगरपालिकेचे मुख्याधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

मतदारांच्या मतदानाच्या दिवशी योग्य सेवा सुविधा देण्याबरोबरच मतदान केंद्रांची पाहणी आणि सुसज्जता याबाबत विशेष लक्ष द्यावे . त्यासाठी प्रत्यक्ष भेटी देऊन आदर्श आचारसंहिता बाबतचे पालन करण्यासाठी सर्वांनी काम करावे. जिल्ह्यात दुबार मतदार नोंदणी बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी .यासाठी केंद्र अध्यक्षांना याबाबत विशेष प्रशिक्षण आणि सूचनाचेही निर्देश देण्यात यावेत असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

नगरपालिका निवडणूक नियमावलीप्रमाणे कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत प्रतिबंधात्मक कारवाई आणि प्रत्यक्ष बंदोबस्त याबाबतचे नियोजन संबंधित नगरपालिका हद्दीतील निवडणूक प्रक्रियेच्या यंत्रणेने करावे. नियंत्रण कक्ष याबाबत विशेष काळजी घेऊन योग्य तो पोलिस बंदोबस्त मागवण्याचे नियोजनही करावे. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन शाळा महाविद्यालयात करण्याबरोबरच मतदान करण्यासंदर्भाचे आवाहन प्रसार माध्यमाच्या माध्यमातून करण्यात यावे. यामध्ये स्थानिक कलाकार, विविध व्यक्ती यांचा सहभाग करून घ्यावा .पारदर्शकपणे निवडणूक होण्यासाठी रिस्पॉन्स टाईम किंवा प्रतिसाद वेळ हे कमीत कमी करण्यासाठीचा प्रयत्न करावा. निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवार वेगवेगळ्या परवानग्यासाठी अर्ज करत असतात या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची यादी नगरपालिका कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावे, जेणेकरून उमेदवाराला आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून त्यांना परवानगी घेणे सुलभ होऊ शकते अशा सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केल्या. नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक विषयी प्रसार माध्यमाला वेळेत आणि अचूक माहिती देण्यासाठी माध्यम कक्ष उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments