नादरपुर येथे गुढीपाडव्यानिमित्त जंगी कुस्तीचा कार्यक्रम संपन्न
कन्नड ग्रामीण प्रतिनिधी.सुनिल निकम कन्नड तालुक्यातील नादरपुर येथील. बुलाखी बाबा व गुढीपाडव्यानिमित्त जंगी कुस्त्याचा आखाडा आयोजित करण्यात आला होता व तो मोठ्या उत्साहात साजरा कुस्ती दहा रूपयापासुन ते सात हजार रुपायापर्यत लावण्यात आल्या होत्या. कुस्ती खेळण्यासाठी ग्रामीण भागातून आले होते.
या वर्षी मोठ्या प्रमाणात पहिलवान व नागरिक सामील झाले होते. नादरपूर.येथील आखाडा प्रसिद्ध असल्यामुळे पहिलवानाने मनसुंपद शेवटच्या कुस्ती समान प्रविण कुराडकर यांनी फटकावला सात हजार एक रुपया नादरपुर नादरपुर परिसरातील सर्वांनी आखाड्याचा आनंद लुटला. यावेळी पिशोर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ग्रामस्थांच्या वतीने व कमेटीच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार मानले.