Sunday, April 12, 2026
Homeऔरंगाबादनादरपुर येथे स्वर्गीय रायभान जाधव व क्रांति सुर्य महात्मा फुले यांची जयंती...

नादरपुर येथे स्वर्गीय रायभान जाधव व क्रांति सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

नादरपुर येथे स्वर्गीय रायभान जाधव व क्रांति सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय रायभानजी जाधव साहेब यांना विनम्र अभिवादन सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी आय.ए.एस. (कलेक्टर) सारख्या मोठ्या पदाचा त्याग करून जनसेवेचा  खडतर मार्ग निवडणारे ते एक ध्येयवादी नेतृत्व होते. त्यांच्याबद्दलच्या काही ओळी: त्याग आणि संघर्षाचे प्रतीक: नोकरी सोडून राजकारणात येताना पहिल्या निवडणुकीत पराभव झाला, पण डगमगून न जाता ‘लोकांसाठी लढणे’ हाच त्यांनी आपला धर्म मानला. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द त्यांच्याकडे होती. कन्नड तालुक्याचे भाग्यविधाते: अंजना, पूर्णा यांसारख्या धरणांच्या निर्मितीतून त्यांनी कन्नड तालुक्याचा कायापालट केला. सिंचनाची सोय करून त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसले आणि खऱ्या अर्थाने ‘हरित क्रांती’चे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.लोकप्रिय लोकनेते
पक्षापेक्षा लोकांच्या प्रेमावर त्यांचा जास्त विश्वास होता, म्हणूनच त्यांनी ‘अपक्ष’ म्हणूनही विधानसभा गाजवली. सत्तेपेक्षा जनतेच्या सेवेला महत्त्व देणारा हा ‘विकास महर्षी’ आजही जनमानसात अजरामर आहे.
अशा या थोर क्रांतीकारकाला आणि विकासाच्या महामेरूला मानाचा मुजरा! व क्रांती सुर्य महात्मा फुले  ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म झाला  अज्ञानाच्या अंधारात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारे महान व्यक्तिमत्त्व…  भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करणारे समाजातील विषमता दूर करून समतेचा मार्ग दाखवणारे क्रांतिकारक… शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, हे जगाला पटवून देणारे विचारवंत… स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून परिवर्तनाची नवी पहाट घडवणारे… शोषित-पीडितांसाठी आयुष्य अर्पण करणारे खरे समाजभूषण म्हणजे *महात्मा जोतिबा फुले…* त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात, संघर्षाची ताकद वाढवतात… त्यांच्या जयंतीनिमित्त  कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञ स्मरण झाले या वेळी समतादूत स्वायत संस्था सुभाष राठोड साहेब  ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments