नादरपुर येथे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सवात साजरी
कन्नड ग्रामीण प्रतिनिधी.सुनिल निकम कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी अखंड हिंदुस्थानाचे महामेरू, स्वराज्याचे जनक,आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती सन्मानीय अध्यक्ष म्हणून साहेबराव रंगराव निकम यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जि. प. प्राथमिक शाळा नादरपूर येथील शालेय विध्यार्थ्यानी शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, मावळे यांची वैशभूषा परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित विविध सांस्कृतीक कार्यक्रम जसे की, पोवाडे, शाहीर गिते, लोककला, भाषण इ. कार्यक्रम सादर केले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीने व जि. प. प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृन्द व विध्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले तसेच गावातील शिवप्रेमी मंडळी यांनी बक्षीस वाटप केले. शाळेतील विध्यार्थ्यानी सादर केलेल्या कार्यक्रमाबाबत शाळेची प्रगती उच्यांक गाठत असल्याने व पुढील पिढी नक्कीच गावाचे नाव देशपातळीवर प्रसिद्ध करणार असल्याचे मनोगत दिलीप निकम प्रशासकीय अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शेवटी ग्रामपंचायत च्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी रामराव बळी यांनी शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना खाऊ व बक्षीस वाटप करून आभार प्रदर्शन केले.
