नादरपुर येथील जि.प्र शाळेत जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील जागतिक दिव्यांग सप्ताह उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपुर केंद्र नाचनवेल जागतिक दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या तसेच त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले विविध क्रीडा स्पर्धांचे यावेळी आयोजन करण्यात आले यासाठी विशेष शिक्षक उत्तम आघाडे पंचायत समिती कन्नड तसेच शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील रामहरी निकम सुनिल जाधव जगन्नाथ कोंडके पोपट जंगले संतोष घोडके कारभारी जंगले या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले व महत्त्वाची भूमिका बजावली या वेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तंटामुक्त अध्यक्ष शालेय व्यवस्थापन सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते.
