आज नादरपूर येथील बुलाकी बाबा यात्रा रविवारी जंगी कुस्त्या आखाडा
कन्नड ग्रामीण प्रतिनिधी.सुनिल निकम कन्नड तालुक्यातील नादरपुर येथे कुस्त्या रसिकांना कळविण्यात आनंद होतो की सालाबादाप्रमाणे याही वर्षा बुलाखी बाबाची यात्रा दि.०२९ शनिवारी यात्रा आखाडा दि.३० रविवारी जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित करण्यात आला आहे.बक्षीस :- ५ रु पासुन ७,००० रु. पर्यंत बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील मल्ल बांधवांनी पहेलवान जास्तीत जास्त संख्येन सहभाग घ्यावा. व कुस्ती शोकीनांनी याचा आनंद घ्यावा ही विनंती.कुस्ती चित पट झाल्याशिवाय बक्षीस मिळणार नाही. कमिटीचा निर्यण अंतीम राहील. वाद घालणा-या मल्लांना नंतर कुस्ती खेळण्यास मनाई करण्यात येणार आहे.याची नोंद घ्यावी.चितपट झाल्याशिवाय बक्षीस मिळणार नाही.कुस्ती खेळतांना जिवीताची काही हानी झाल्यास जबाबदारी ज्याची त्याच्यावर राहील. तक्रार करणा-या खेळाडुंना कुस्तीतुन बाद करुन बक्षीस मिळणार नाही. व पंचाचा निर्णय अंतीम राहिल यांची सर्वानी नोंद घ्यावी.
शनिवारी रात्री ९ वा. शिवमल्हार वाघे बाळू भाऊ भुजंग चिंचोलीकर यांचा वाघ्या मुरळीचा दनदनीत कार्यक्रम होईल.या कार्यक्रमाचा सर्व मंडळीनी लाभ घ्यावा असे आवाहन
समस्त गावकरी मंडळी नादरपूर यांनी केले आहे.