नादरपूर येथील मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामसभा घेण्यात आली
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथे १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय नादरपूर ता. कन्नड येथील ध्वजारोहण सकाळी ठिक :-७-३० वा.नादरपूर येथील जेष्ठ नागरिक सन्माननीय नारायण नामदेव वाघ यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले व मध्यवर्ती सहकारी बँक नादरपूर येथील ध्वजारोहण गावातील जेष्ठ नागरिक शेषराव मुकुंदा निकम यांचे हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपूर येथील शाळेचे ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक ए. एस. गाडेकर यांचे हस्ते करण्यात आले ध्वजारोहण झाल्यानंतर जि प्र प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.त्यानंतर सकाळी ठिक ९:३० वा. मारोती मंदिर सभागृह येथे शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान बाबत किसन खंडू निकम ग्रामपंचायत सदस्य यांचे अध्यक्षतेखाली व सन्माननीय श्रीयुत एम.व्ही. देशपांडे संपर्क अधिकारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पंचायत समिती कन्नड यांचे उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. त्यात समिती गठीत करून अभियान राबविण्याचे ठरले
याप्रसंगी तंटा मुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शालेय समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सोसायटी व्हा. चेअरमन, सदस्य, शाळेचे मुख्यद्यापक, शिक्षक, बॅंकचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी,आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस,पोलीस पाटील, कोतवाल, विध्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
