नादरपुर येथील ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथील ४१ वर्षीय तरुण शेतकऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रात्री तीन वाजता उघडकीस आली. ज्ञानेश्वर हरिश्चंद्र जाधव (४१) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. ज्ञानेश्वर हरिश्चंद्र जाधव यांची नादरपुर शिवारात गट १७७ वडिलांच्या नावे शेती आहे त्यांच्यावर खाजगी कर्ज असल्याने शेतीची नापकी झाल्यामुळे नैराश्यातून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. व रात्री अचानक त्यांच्या पत्नीला जाग आली व त्यांनी पाहिले ही बाब लक्षात येताच गावातील ग्रामस्थ काकासाहेब कचरु निकम यांनी साडेतीन-चार दरम्यान पोलीस पाटील रामकिसन सोनवणे यांना माहिती दिली यांनी पिशोर पोलिसांना माहिती कळवली. पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार किरण गंडे यांनी पंचनामा करून नाचनवेल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नाचनवेल येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सकाळी ११ वाजता नादरपूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. पिशोर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार किरण गंडे करीत आहे.
