नादरपुर डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
कन्नड ग्रामीण/ प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील नादरपुर येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सरपंच सविताबाई दिलीप निकम यांनी ध्वजारोहण व पूजन केले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आधारित विद्यार्थ्यांनी भाषणे केले समता व बंधुता आणि न्याय या तत्वांच्या आधारावर मानवतावाद प्रस्थापित करून, समतामुलक लोकशाही निर्माण करणारे, परंपराधिष्ठित, विषमतेने ग्रासलेल्या समाज व्यवस्थेला गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त करून मानवी मूल्यांवर आधारित भारताला कृतिशील तत्त्वज्ञान व प्रभावशाली राष्ट्र बनवण्यासाठी प्रेरणा देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त यावेळी जिल्हा प्रशासकीय अधिकारी दिलीप निकम ग्रामपंचायत सर्व सदस्य शालेय समितीचे सर्व सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष व जि प्र शाळेतील शिक्षक सर्व समाज बांधव हजर होते