ऐन सनासूदीच्या महूर्तावर कन्नड नगरीत तीव्र पाणी टंचाई
कन्नड/ तुडुंब भरलेले धरण उषासी तर कोरड घशासी अशी अवस्था सद्या या कन्नड नगरीतील नागरिकांची झाली आहे.तालुक्यात झालेली अतिवृष्टी त्यामुळे तुडुंब भरलेली धरणे जिकडे तिकडे पाणिच पाणी झालेले असतांनाही हरित कन्नड नागरीतील नगर परिषदेचा चाललेला गलथान कारभार अजूनही जशास तसा चालू आहे.आज रोजी सर्वत्र सनासूदीचे दिवस चालू आहे.दहा बारा दिवसावर दीपावलीचा सन येऊन ठेपला आहे.शहरातील प्रत्येक घरी साफसफाईचे कामे चालू आहे.पण नळास पाणीच नाही. दुसरीकडे शहरास पाणी पुरवठा करणारा अंबाडी प्रकल्प ओहोरफ्लो ओसोंडून होऊन वाहत आहे. इतके सर्व असतांनाही केवळ या न.परिषदेच्या गलथान कारभारामुळे ऐन सनसुधीच्या काळत शहर वासियांना विशेष करून महिला वर्गास आपल्या घरांची स्वच्छता करणेसाठी पाणी मिळत नाही.हिच खरी या हरित कन्नड न.परिषदेच्या प्रशासकीय कामाची शोकांतिका आहे.