मुसळधार पावसामुळे गाड्यांच्या फेऱ्या रद्द
हैदराबाद विभागाती भिकनूर – तळमडला सेक्शन तसेच अक्कनपेट – मेडक सेक्शन या मार्गांवर मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने काही गाड्या रद्द, काहींचे मार्ग वळविण्यात आले असून काही गाड्या आंशिक रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत –
1) काचेगुडा – नागसरोल (17661)
2) काचेगुडा – नरखेड (17641)
3) नांदेड – मेडचल (77606) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत:
1) नागसरोल – काचेगुडा (17662) व
2) नरखेड – काचेगुडा (17642) या गाड्याही रद्द राहतील.
मार्ग वळविण्यात आलेल्या गाड्या :
दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी साईनगर शिर्डी – तिरुपती (17418) ही गाडी परभणी – परळी वैजनाथ – विकाराबाद मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच काचेगुडा – भगत की कोठी (17605) ही गाडी काचेगुडा – मौला अली जी – काझीपेट – पेड्डपल्ली बायपास – करीमनगर – निजामाबाद या वळण मार्गे चालविण्यात येईल.
आंशिक रद्द गाड्या :
दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी निजामाबाद – तिरुपती रायलसीमा एक्सप्रेस (12794) ही गाडी निजामाबाद – सिकंदराबाद दरम्यान आंशिक रद्द करण्यात आली आहे, तर नांदेड – विशाखापट्टणम (20812) ही गाडी नांदेड – चारलापल्ली दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
