पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते
पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण
जालना : जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून 1 कोटी 82 लक्ष रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला होता. या निधीतून पोलिस विभागाने एकुण 12 वाहने घेतली यात महिंद्रा स्कॉर्पिओ, बंदोबस्तासाठी मोटारगाड्या आणि पाण्याचे टँकर यांचा समावेश आहे. पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते शनिवार दि.14 जुन 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता पोलिस कवायत मैदानावर नवीन वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ.कल्याण काळे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरिष बनसोडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलिस विभागाच्या वाहनांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच पोलिस विभागाच्या वाहनांनी यावेळी पथसंचलन देखील केले.
