बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेसाठी अर्ज करावेत
जालना : बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन 2025-26 या वर्षात जिल्हा परिषदेस 32 लक्ष रुपये निधी शासनाकडुन मंजुर करण्यात आला आहे. तरी जालना जिल्ह्यातील अनुसुचित जमाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे अवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार व अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे.
अनुसुचित जमाती प्रर्वगातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतीसाठी अर्थ सहाय्य देण्याची सन 1992-93 पासुन राबविण्यात येत असलेली विशेष घटक योजना दि. 30.12.2017 च्या शासन निर्णयाव्दारे बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना या नावाने राबविण्यात येते. या योजनेस शासनाच्या सामाजिक न्याय विभागा कडुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यावे मार्फत जिल्हा परिषदेस निधी उपलब्ध करुन दिला जातो. सन 2020-21 पासुन महाडीबीटी पोर्टलव्दारे या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असुन या योजनाअंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकृती पासुन लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान अदा करण्यापर्यतची सर्व सुविधा महाडीबीटी पोर्टलव्दारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना पुढिल प्रमाणे खालील घटकासाठी त्यापुढे नमुद रक्कमेच्या उच्चयतम अनुदान मर्यादेत राबविण्यात येते. लाभासाठी संपर्क तालुकास्तरावर पंचायत समितीमधील कृषि अधिकारी तर जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेतील कृषि विकास अधिकारी यांच्याकडे साधावा. असेही कळविले आहे.
