Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादमुंबईकर मंडळ बोरघर आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा 

मुंबईकर मंडळ बोरघर आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा 

मुंबईकर मंडळ बोरघर आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा 
गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थ्यांना सेवा निवृत्त मुख्याध्यापक गुळवणी सरांचे करिअर निवड विषयी मौलिक मार्गदर्शन
बोरघर/माणगाव/ मुंबईकर मंडळ बोरघर आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता विठ्ठल रखुमाई मंदिर बोरघर च्या प्रांगणात उपरोल्लेखित मंडळाच्या वतीने  बोरघर गावातील स्थानिक व मुंबई स्थित इयत्ता दहावी, बारावी, पदवीधर आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध फिल्ड मधील अहर्ता प्राप्त गुणवंत गुणवत्ता धारक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या गुणगौरव सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
     सदर कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करून करण्यात आली. त्यानंतर  विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागत गीत सादर केले. सदर कार्यक्रमात मुंबईकर मंडळ बोरघर आयोजकांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नुतन माध्यमिक विद्यालय खरवली हायस्कूल चे सेवानिवृत्त विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक विनायक रघुनाथ गुळवणी सर यांचा शाल, श्रीफळ, आणि पुष्प गुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तद्नंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, तद्नंतर उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. आणि त्या नंतर गावातील दहावी, बारावी, पदवीधर व आणि अन्य शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत गुणवत्ता धारक विद्यार्थी, विद्यार्थिनीं यांचा पालकांसमवेत प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, फोल्डर फाईल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मांगले व प्रदीप मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. मुख्याध्यापक गुळवणी सर, मुंबई अध्यक्ष राजाराम मोहे, स्थानिक अध्यक्ष    शाहिर  राजाराम बुवा जाधव, पत्रकार विश्वास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास बोरघर गावातील अनेक दानशूर स्थानिक आणि मुंबई कर शिक्षण प्रेमींनी मुक्त हस्ते आर्थिक मदत दिली. या कार्यक्रमाला मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष राजाराम मोहे, उपाध्यक्ष केशव कालप, सेक्रेटरी गणेश मांगले,उपसेक्रेटरी गणेश मोहे, खजिनदार गणेश जाधव, उप खजिनदार गणेश मोहे, कमिटी सभासद संतोष निंगावले, प्रकाश म्हसकर,पुनाजी वाघरे, संदीप वाघरे, विकास मोहे, राजेश कालप, प्रदीप मोरे, अशोक म्हसकर, मारुती म्हसकर, सुधाकर मांगले,समीर साखरे, बोरघर स्थानिक अध्यक्ष लोकशाहिर,बोरघर चा बुलंद आवाज राजाराम बुवा जाधव, उपाध्यक्ष दत्ताराम मोहे, सेक्रेटरी दिलीप साखरे, उप सेक्रेटरी तथा बोरघर वारकरी संप्रदाय अध्यक्ष संजय सुतार, खजिनदार दिनेश मोहे, उप खजिनदार सखाराम गायकवाड, मा . अध्यक्ष सुभाष मोहे, मा . उपाध्यक्ष पत्रकार विश्वास गायकवाड, मा.अध्यक्ष सखाराम मोहे, मा.स.सेक्रेटरी सुरेश मांगले , सहदेव मोहे, किर्तनकार पंडित महाराज शेडगे, मा. ग्रामपंचायत सदस्य संतोष कळंबे, दत्ताराम वाघरे, मा. विस्तार अधिकारी रमेश शिगवण, तुकाराम मोहे, महादेव मोहे, वैभव मोहे, रमण जाधव, नारायण मांगले, बळीराम वाघरे, रमेश मोरे, नामदेव मोहे, चंद्रकांत जाधव, चंद्रकांत मांगले, युवा नेते श्रीराम कळंबे, सुभाष कालप, श्रीपत नाक्ती, लक्ष्मण भागडे, महेश मोहे, राजाराम कळंबे, विठ्ठल कळंबे, नंदकुमार कळंबे मितेश मोहे इत्यादी स्थानिक व मुंबईकर,महिला मंडळ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानंतर अल्पोपहार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments