मुलांसोबत वाढदिवस साजरा करून दिली समाजाला प्रेरणा
माथाडी कामगार चे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अशफाक अली यांनी
सावंगी – मदरसा दारुल अमल येथे मराठवाडा सरचिटणीस, माधाडी कामगार विभागाचे सय्यद अशफाक अली यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या प्रसंगी मदरशातील लहानग्या मुलांनी कुरआन शरीफचे मधुर पठण करून वातावरण भारावून टाकले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला डॉ. अफसर शेख (संपादक – आरोग्य जागृती), साजीद पटेल, इमाम तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते. मुलांच्या डोळ्यांतली निरागस चमक आणि आनंद पाहून उपस्थित मान्यवरही भावुक झाले.
या प्रसंगी बोलताना सय्यद अशफाक अली म्हणाले की, “वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस नसून तो समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देणारा क्षण असतो. प्रत्येकाने आपला आणि आपल्या परिवारातील वाढदिवस अशाच साध्या व सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा करावा.”
कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी मत व्यक्त केले की, विविध राजकीय पक्षांचे नेतेमंडळी देखील जर अशा पद्धतीने मुलांसोबत वाढदिवस साजरा करतील तर पुढील पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल.
लहान मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यातून आणि सामूहिक आनंदोत्सवातून या वाढदिवसाला एक वेगळीच ऊब आणि सामाजिक संदेश लाभला.