Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबाद"मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम"

“मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम”

“मुक्तिसंग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा’; बार्टीतर्फे आज कार्यक्रम”

छत्रपती संभाजीनगर –  संविधानाचा व्यापक जागर व्हावा व संविधान घराघरात रुजावे तसेच मराठवाडा मुक्तिसंग्रामाची महती लोकांपर्यंत जावी, यासाठी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या औचित्याने आज छत्रपती संभाजीनगर येथे  बुधवार दि.१७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन  व प्रशिक्षण संस्था बार्टीच्यावतीने” मुक्ती संग्राम मराठवाड्याचा जागर संविधानाचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

            भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टाने संविधान लिहून या देशातील नागरिकांना त्यांचे संविधानिक हक्क व अधिकार मिळवून दिले.त्यामुळेच आज आपला देश एकसंघ आहे, याचे सर्व श्रेय भारतीय राज्यघटनेचे आहे.

यंदाचे वर्ष हे संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन असून हैद्राबाद संस्थान भारतात विलीन होण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका महत्वपूर्ण होती.  डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे संस्थेच्यावतीने संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून संविधान जनजागृती व मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याला बार्टी उजाळा देणार आहे. दि.१७ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया नाट्यमंदिरात सकाळी ११ ते सायं साडेपाच वा. पर्यंत हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी  इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ आमदार विक्रम काळे, रमेश बोरनारे खासदार डॉ भागवत कराड खा.संदिपान भुमरे, यांच्यासह अन्य विधान परिषद व विधान सभेचे सदस्य तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे समाजकल्याण आयुक्त दिपा मुधोळ मुंडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. अनंत राऊत, रवींद्र जोगदंड यांचे व्याख्याने होणार आहेत. त्याचबरोबर “स्वर संविधानाचे” हा विशेष संगीतमय कार्यक्रम कुणाल वराळे व संच सादर करणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बार्टीचे  महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments