Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमोटार सायकलच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत

मोटार सायकलच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत

मोटार सायकलच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत

जालना :- नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल नोंदणी मालिका एमएच 21 सी ई- ही सद्यस्थितीत सुरु असून या मालिकेतील क्रमांकाचे वाटप पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल वाहनांसाठी एमएच- 21 सी एच 0001 ते 9999 ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. तरी ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनासाठी पसंतीचा क्रमांक घ्यावयाचा आहे अशा व्यक्तींनी दि. 23 जुन 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

ज्या वाहन धारकांना पसंतीचा नोंदणी क्रमांक घ्यावयाचा असेल त्यांनी आपला विहीत नमुन्यातील अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा मुळ किमतीचा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट, ओळखपत्राच्या (आधारकार्ड) छायांकित प्रतिसह (स्वयंसाक्षांकीत), पॅनकार्ड व दुरध्वनी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना कार्यालयात अर्ज जमा करावा. नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकाचे वाटप ‘महाराष्ट्र मोटार वाहन नियम’ व परिवहन आयुक्तांचे परिपत्रकानूसार करण्यात येईल. तसेच एकाच आकर्षक क्रमांकासाठी अनेक अर्जदारांनी अर्ज केल्यास त्यासाठी विहीत पध्दतीने लिलावाची प्रक्रीया अवलंबिण्यात येईल. एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आलेले असतील तर एका क्रमांकासाठी एका पेक्षा जास्त आलेल्या अर्जदारांनी वाढीव रकमेचा एक धनाकर्ष आणणे आवश्यक आहे. पहिला धनाकर्ष मुळ किंमतीचा व दुसरा धनाकर्ष आपण लावलेल्या बोलीच्या वाढीच्या रकमेचा असावा. धनाकर्ष विहीत शुल्कापेक्षा सर्वात जास्त रकमेचे ज्यांचे असतील त्यांनाच हा क्रमांक आरक्षित करुन दिला जाईल. सर्व संबंधितांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांच्या नावावर आपले धनाकर्ष बंद लिफाफ्यात दि. 23 जुन 2025 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करावेत. वेळेनंतर कोणत्याही सबबीवर धनाकर्ष जमा करुन घेण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच दुपारी 3 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील. त्यावेळी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments