Friday, October 31, 2025
Homeऔरंगाबादछत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव तळा तालुका या ठिकाणी अनंत गोपाळ...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव तळा तालुका या ठिकाणी अनंत गोपाळ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न

छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सव तळा तालुका या ठिकाणी अनंत गोपाळ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न
    
बोरघर/माणगांव/ समता, बंधुता, न्याय यांची शिकवण देणारे, दीन दुबळ्यांचे तारणहार, थोर समाज सुधारक, आरक्षणाचे जनक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे पुढारी संबोधणारे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा १५१ वा जयंती महोत्सव दि.२६ जून २०२५ रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्दमहासभा तालुका शाखा तळा व बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा तळा यांच्या संयुक्त विद्यमाने मु.तळा भारतीय बौध्दमहासभा तालुका शाखा संपर्क कार्यालय या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती तालुका तळा अध्यक्ष अनंत गोपाळ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      याप्रसंगी मानव आदर्शांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व सुत्रपठण संस्कार उपाध्यक्ष नरेश मोरे यांनी केले. शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखा तळा अध्यक्ष रामदास शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या, तद्नंतर बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.४ चे अध्यक्ष संदेश पवार, पल्लवीताई सकपाळ, भारतीय बौद्धमहासभा तळा संघटक सुरेंद्र शेलार यांनी शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रामुख्याने मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी भारतीय बौद्धमहासभा तळा तालुका माजी कार्यालयीन सचिव केशव लोखंडे यांनी आपल्या शैक्षणिक सेवेतील कार्यकाल पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने त्यांचा दोन्ही तालुका संस्थांच्यावतीने आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.
      या प्रसंगी तालुका सचिव गणपत जगताप,महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, हरिश्चंद्र शिंदे, मधुकर नाक्ते, संरक्षण प्रमुख मनोहर शिंदे, महादेव जगताप, विठ्ठल जगताप, युवराज जाधव, यशवंत जाधव, सुधीर शिंदे, रवींद्र जगताप, अनिशा जगताप, विजया जगताप, सुमन सकपाळ, विशाखा शिंदे, बहुजन समाजातील अकबरभाई गोठेकर, त्याचप्रमणे समता सैनिक दलाचे जवान प्रथमेश शिंदे, सैनिक शिशुपाल गवाणे व सैनिक दिक्षा जगताप तसेच आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते, या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुरेंद्र शेलार यांनी केले. याप्रसंगी सरणत्तय घेऊन व महापुरुषांच्या नावाचा जयघोष करून अध्यक्षीय भाषणाणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments