Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादमिक्सर हायवा व मोटार सायकल च्या अपघातात एक ठार एक जखमी

मिक्सर हायवा व मोटार सायकल च्या अपघातात एक ठार एक जखमी

मिक्सर हायवा व मोटार सायकल च्या अपघातात एक ठार एक जखमी
बिडकीन/ बिडकीन संभाजीनगर रोड वर मोटारसायकल व मिक्सर हायवाचा अपघातता एक ठार व एक जखमी. सविस्तर माहिती अशी की बिडकीन येथील विशाल भगवान राठोड 22 हें आपल्या मोटर सायकल क्र MH 20 GM 7957 हें आपल्या बिडकीन कडे येत असताना समोर येणाऱ्या हायवा मिक्सर क्र MH20 EG 8233जोरदार धडक दिल्याने विशाल राठोड हें अपघातात मृत् झाले. व त्यांच्या सोबत असणारे
सचिन रुपसिंग राठोड वय 21 रा,खंडाळे तालुका अहमदपूर जिल्हा लातूर, हें गंभीर जखमी झाले त्यांना
तातकाळ स्थानिकांच्या मदतीने जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी संस्था नानिजधामचि रुग्णवाहिका मदतीने  पेशंटला सरकारी दवाखाना घाटी बिडकीन येथे दाखल केले. घाटीतील डॉक्टर ने तपासणी करून मृत घोषित केले. मृतदेहाचे पोस्टमार्टम करून अंतिम संस्कारासाठी विशाल राठोड चे प्रेत वैजनाथ परळी येथे नेण्यात आले. विशाल राठोड हें अत्यंत मनमिळाऊ स्वभावचे होते. त्यांनी अल्पवाधित मैत्री कट्टा ह्या नावाने चहाची हॉटेल प्रसिद्ध केली होती त्यांच्या अपघातची माहिती समजताच बिडकीन परिसरात लोकांनी घाटी दवाखान्यात गर्दी केली होती.विशाल यांच्या जाण्याने परिसरात शोक काळा पसरली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments