मंत्री मंगलप्रभात लोढा यांची अभिनव संकल्पना : उद्योजकासाठी
प्रशिक्षण मेळावा आयोजन
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणींबाबत उद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दे आसरा फाउंडेशन व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि.23 मे देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील विविध क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या उद्योजक मेळाव्यामध्ये श्री प्रकाश आगाशे, प्रोग्रॅम मॅनेजर, दे आसरा फाउंडेशन, शिवप्रसाद जाजू, सीईओ, पवन ग्रुप व डॉ. आनंद गोडसे कन्सल्टिंग हेल्थ सायकॉलॉजिस्ट हे उपस्थित सूक्ष्म व लघु उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. या लघु उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रम सहभागींना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
दिनांक 23 मे, 2025 सकाळी 11:00 ते 02:00 वाजे पर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित रहून या संधीचा जास्तीत जास्त लघू उद्योजकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडीअडचणींबाबत जसे की, फंडिंगचे विविध प्रकार, लोन प्रपोजल, लोन प्रक्रिया यांची माहिती,आपला व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची ओळख कशी निर्माण करावी, यात व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी सुधारायची याबाबत तज्ञ मार्गदर्शन व तरुण व्यावसायिक व उद्योजकांना संवाद कौशल्य व खंबीरपणा टीमवर्क व सर्जनशीलतेच्या माध्यमातून तज्ञ प्रोत्साहनकरिता कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा.ना.श्री मंगलप्रभात लोढा, यांच्या अभिनव संकल्पनेतून रोजी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक मेळाव्या करिता उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
