विप्र फाउंडेशनतर्फे गायत्री
मंदिर परिसरात वृक्षारोपण
पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज-जयप्रकाश श्रीमाली
जालना/प्रतिनिधी/ विप्र फाउंडेशन, जालना शाखेच्यावतीने शहरातील गायत्री मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विप्र फाउंडेशनचे अध्यक्ष जयप्रकाश श्रीमाली, सचिव पं. विजय व्यास, पवन जोशी, रामनिवास गौड, चंद्रप्रकाश श्रीमाली, सुर्यप्रकाश ओझा, भगवान दायमा, सुरेश दायमा, दिलीप व्यास, बालू व्यास, राहुल व्यास, दीपेश व्यास आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष जयप्रकाश श्रीमाली यांनी आपल्या वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. पाणीटंचाई, वाढते प्रदूषण आणि उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. एक झाड म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. या उपक्रमात सर्व मान्यवर व सदस्यांनी सहभाग नोंदवत वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याची शपथ घेतली.