कार्यक्रमात सुरूवातीला माता सरस्वती, भगवान श्री गणेश व छत्रपती महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमापूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे विश्वस्त केशवजी लीला, शाळा समितीचे अध्यक्ष सच्चानंदजी अग्रवाल, उपाध्यक्ष गोकुळजी अग्रवाल, सचिव निधीजी विजयजी अग्रवाल, कोषाध्यक्ष पंकजजी अग्रवाल, सदस्य संतोषजी डी. धानुका, अग्रवाल सभा अध्यक्ष कुंजबिहारीजी अग्रवाल, शाळा समितीचे माजी अध्यक्ष राजकुमारजी टिबडेवाला, प्रीतेशजी धानुका यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंतांचा सत्कार व कौतुक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी यशवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व नेत्रदिपक कामगिरीच्या सातत्याचा आशिर्वाद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शिस्तबद्ध आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य संतोष कुमार करवा व उपप्राचार्या मयुरी लोगलवार, अधीक्षक अजय सोनुने यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन सर्व विभागांचे विभाग प्रमुख व इव्हेंट विभागप्रमुख विक्रम शर्मा यांनी केले. कार्यक्रमाच्या संपन्नतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अविरत परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सुमीत पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
