खुलताबाद शहरात एमआयएम पक्षाला खिंडार!
तालुका अध्यक्ष अब्दुल मजीद मणियार यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील राजकारणाला मोठा कलाटणी देत, एमआयएमचे तालुका अध्यक्ष अब्दुल मजीद मणियार यांनी शुक्रवारी आपल्या शेकडो समर्थकांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. औरंगाबाद येथील नेहरू भवनात झालेल्या या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी आमदार कुणाल चौधरी, खासदार डॉ. कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पाटील. माजी आमदार एम एम शेख. इब्राहिम पठाण, शेख यांच्या प्रमुख उपस्थिती होती. अब्दुल मजीद मणियार हे गेल्या अनेक वर्षांपासून एमआयएम पक्षात सक्रीय असून तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत होते. खुलताबाद शहरातील पाणीटंचाई,काळात अब्दुल मजीद मणियार यांनी खुलताबाद नगरपरिषद मार्फत शहरात पाणीपुरवठा दूषित पाण्याची समस्या मात्र डोके वर काढत होते.शहरात गेल्या काही दिवसापूर्वी शहराचे अनेक भागात नळाला दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. यामध्ये काही भागात दूषित पाणीपुरवठा होत होते. यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी नगरपरिषद च्या पाणीपुरवठा अभियंता यांना सांगून ही या पाणीपुरवठ्यात कुठलीही सुधारणा झाली नाही. मात्र नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम केल्याची माहिती दिली होते.त्वचारोग आणि पोटाच्या विकारांना आमंत्रण मिळत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आले होते.मात्रा या गंभीर प्रश्ना संदर्भात अब्दुल मजीद मनियार यांनी न्यायालयीन लढाई उभा केले होते..
यामुळे खुलताबाद शहरातील नागरिकाशी चांगले संबंध असल्यामुळे खुलताबाद शहरातील नागरिकाचे अडचणी यावर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.त्यांच्या सामाजिक कार्यामुळे विशेषतः तरुण वर्गात त्यांची लोकप्रियता अधिक आहे. मणियार यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे खुलताबाद शहरासह तालुक्यात राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमआयएम पक्षाची या ठिकाणी मजबूत पकड होती,मात्र त्यांच्या या निर्णया मुळे काँग्रेस पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये नव्या ताकदीची भर मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या प्रसंगी बोलताना मणियार म्हणाले,
“काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहिले जाते.जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मी माझ्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.” कार्यक्रमात जिल्हा काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँग्रेसचे प्रभारी कुणाल चौधरी यांनी मणियार यांचे स्वागत करताना म्हटले,
“खुलताबाद शहराला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी डगमगू नका.काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी झटून काम करा.माजीद मणियार यांच्यासारख्या नेतृत्वामुळे काँग्रेस तालुकाभरात बळकट होईल,याची मला खात्री आहे. जिल्हा सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर ताकदीने तुमच्या पाठीशी उभे राहतील.”
