एस एम ग्रुप कंपनी अकणी ऑड.मिलींद मोरे यांचा उपक्रम
आष्टी/प्रतिनिधी/ विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय ठरवून स्वतःच्या विचाराने चालले पाहिजे. खूप आयुष्य आपल्या समोर आहे, त्यासाठी परिश्रम घ्या. शिक्षणासोबतच मैदानी खेळ खेळत जा. खेळातून आपले आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहते, असे प्रतिपादन प्रा. सिद्धार्थ पानवाले यांनी केले.
परतूर तालुक्यातील पिंपळी धामणगाव येथील जि. प. प्रा. शाळेतील वर्षे भरात विविध स्पर्धेत विजेता विद्यार्थ्यांना एस एम ग्रुप कंपनी अकणी याचे मालक अॅड. मिलिंद मोरे यांच्याकडून भारतीय संविधानाच्या चाळीस प्रती, वह्या, पेन व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी समग्र शिक्षण विभागाचे अभियंता किशोर दाभाडे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश ढवळे, केंद्र प्रमुख जोगडे, रत्नपारखे, महिला बालकल्याण विभागाच्या सुपरवायझर गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप राठोड हे उपस्थित होते.
पुढे प्रा. सिध्दार्थ पानवाले म्हणाले की,शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय ठरवून स्वतःच्या विचाराने चालले पाहिजे. त्यातच यश मिळते.पालकानी पण आपले इच्छा,महत्वकाशा आपल्या मुलांवर लादू नये.त्याला शिक्षणाच्या बाबतीत पुर्ण स्वतंत्र दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी जर डॉक्टर, इंजिनिअर, चार्टर्ड अकाऊंटंट व्हायचे ध्येय ठरविले तर त्यासाठी खुप परिश्रम घ्यावे लागेल.शिक्षणासोबत आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळत जा. असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.दरम्यान, शाळेत प्रती विद्यार्थी एक वृक्ष लागवड करण्यात आली.अॅड. मिलिंद मोरे म्हणाले की, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि मानवी स्वार्थापायी होणाऱ्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे हवामान बदलत आहे आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.याचा आपण कोरोना काळात चांगला अनुभव घेतला आहे.या सर्व कारणांमुळे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही आता काळाची गरज बनली आहे. प्रास्ताविकेत प्रल्हाद वाहुळे यांनी या शाळेला नवीन दोन खोल्यांचा प्रस्ताव व इतर भौतिक सुविधा पुरविण्यात याव्यात व विशेष लक्ष देण्याचे विनंती समग्र शिक्षण विभागाचे अभियंता दाभाडे यांच्याकडे केली.यावेळी अंबादास पौळ, शेषेराव झोटे, भरत मोरे , बि.खरात आरोग्य सेविका शिंदे मॅडम तर संतोष वाहुळ, पांडुरंग काळे, बाळासाहेब वाहुळ, ऋषिकेश मोगरे ,असरफ बेग ,हरीभाऊ शिर्के ,संदीप वाहुळे यांच्यासह शाळेतील शिक्षक,विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सुत्रसंचलन विनोद खिल्लारे तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक पांडूरंग भोसले यांनी केले.
