एमजीएम विद्यापीठ जेएनईसीच्या स्वयंभू – २५ चे आयोजन २८ मार्च रोजी
छत्रपती संभजीनगर/ महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या जेएनईसीचे स्वयंभू – २०२५ या तंत्रसंमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, दिनांक २८ मार्च २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे. रुक्मिणी सभागृहात होणाऱ्या उद्घाटन सोहळा उद्योग क्षेत्रातले नामवंत, ग्रीव्ह्ज् कॉटनचे प्रशांत नरवाडे, क्युबॅटीक इंजिनिअरिंगचे व्यवस्थापकीय संचालक अब्दुल वाजीद शेख, निम्रा प्रॉडक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निषाद रांगणेकर, जॉन्सन अॅड जॉन्सन्सचे अनुराग कल्याणी, योजना-कार्किटेक्टस्चे श्याम शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत असणार आहे.
उद्घाटन प्रसंगी एजीएम विद्यापिठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आषिश गाडेकर, अधिष्ठाता डॉ. हरिरंग शिंदे, जेएनईसीच्या प्राचार्या डॉ.विजया मुसांडे आणि स्वयंभूच्या समन्वयिका डॉ. विजया प्रधान व्यासपिठावर उपस्थित असतील.
‘स्वयंभू’ हा तंत्राविष्कार संमेलन जेएनईसीत दरवर्षी आयोजित होत असते. दिनांक २८ आणि २९ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या स्वयंभूसाठी राज्यस्तरावरून एक हजाराहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत वैविध्यपूर्ण आणि कल्पक स्पर्धा, गेमींग आणि तंत्रप्रतिभेला यात वाव दिलेला आहे, क्लीझ वर्कशॉपस्, ई-स्पोर्टस्, कार्टो फेस्ट, आयडीया प्रेसेंटेशन, ब्रिज मेकिंग, ड्रोण ट्रेनिंग, ऑटो कॅड यासारखे प्रकारही यात आयोजित करण्यात आलेले आहेत.
सदर तंत्र संमेलनात विविध औद्योगिक संस्थांनी प्रायोजित केलेले असून कालीका स्टील्स हे गोल्डन स्पॉन्सर्स आहेत. ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्यांनी 7387183408, 9922020707, 8275326007 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजन समिती तर्फे करण्यात आहे. सदर संमेलन विद्यार्थी, पालक आणि जिज्ञासूंसाठी उपलब्ध आहे. असे सहसमन्वयक प्रा.लक्ष्मीकांत कोकाटे व सहआयोजकांनी केले आहे.
