एमजीएम विद्यापीठात ‘गांधींच्या देशात…’ चा प्रयोग
छत्रपती संभाजीनगर,दि.२९ : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने मंगळवार,दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता चिंतनगाह येथे “गांधींच्या देशात…” या एकांकिकेचे सादरीकरण संपन्न होणार आहे.
सादर होणाऱ्या या प्रयोगास कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, अधिष्ठाता डॉ.रेखा शेळके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रमेश पवार उदगीरकर लिखित व डॉ.राजू सोनवणे दिग्दर्शित ‘गांधींच्या देशात..’ या प्रयोगात गौरव देशमुख, समीक्षा सराफ, प्रथमेश सैंदाणे, रोहित रेशवाल, प्रतीक आडे, कबीर माने, महेश नलावडे, प्रतीक कणसे, संकेत गादीकर, सुधीर चव्हाण आणि आदित्य कुलकर्णी हे विद्यापीठातील विद्यार्थी भूमिका साकारणार आहेत. या प्रयोगास सर्वांना खुला प्रवेश असून मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षकांनी या प्रयोगास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
