एमजीएमच्या प्रा.उत्तरा देशमुख यांना पीएचडी प्रदान
छत्रपती संभाजीनगर, दि.३ : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ बेसिक अँड अप्लाईड सायन्स विभागातील प्रा.उत्तरा देशमुख यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा.उत्तरा देशमुख यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ.प्राप्ती देशमुख व सर्व संबंधित प्राध्यापक व सहकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रा.उत्तरा देशमुख यांनी गणित विषयात ‘अ स्टडी ऑफ फ्रॅक्शनल डिफरेन्शियल इक्वेशन्स अँड इट्स अप्लिकेशन्स’ या विषयावर आपले संशोधन केले आहे. त्यांनी महात्मा गांधी मिशन विद्यापीठातून डॉ.जी.सी.लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली पीएचडी पूर्ण केली आहे.
