महिला बाल रूग्णालयातील शौचालये सुरू करा,अन्यथा आंदोलन
युवा सेनेच्या शुभम टेकाळे यांचा गांधीचमन येथे ईशारा
जालना /प्रतिनीधी / जालना महिला बाल रूग्णालयात रुग्णांच्या नातवाईकांसाठी नव्यानं बांधण्यात आलेले शौचालये सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा ईशारा आज दि.11 रविवार रोजी सायं.पाच वा. च्या सुमारास गांधी चमन येथे युवा सेनेच्या शुभम टेकाळे यांनी दिला. शहरातील महिला घाटी रुग्णालये अत्यंत महत्वाच रुग्णालय असून या ठिकाणी जिल्हा भरातून हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात.मात्र शौचालया अभावी त्यांचे हाल होतात.अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून महिला रुग्णालयात नव्यानं शौचालये बांधण्यात आले आहेत मात्र काम पूर्ण होऊन देखील ते सुरू करण्यात आलेले नाहीत.त्यामुळे तातडीने हे शौचालय सुरू करावे अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.ही शौचालये तातडीने सुरू न झाल्यास युवा सेनेच्या वतीने आंदोलन केले जाईल असा ईशारा शुभम टेकाळे यांनी दिला आहे