म्हैसमाळ तलावात आढळला ३३ वर्षीय इसमाचा मृतदेह,खुलताबाद पोलिसांत आकस्मिक मृत्युची नोंद
खुलताबाद /प्रतिनिधी/ खुलताबाद-तालुक्यातील म्हैसमाळ येथील तलावात सोमवारी (दि.२६) एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती मृताचे नांव संदिप नामदेव हिवराळे (वय ३३ ,रा.संजयनगर,मुकुंदवाडी, औरंगाबाद ) असे असून त्याचा बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेची माहिती पोलीस पाटील संजय जाधव यांनी दिल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत संदिप हिवराळे याचा मृतदेह तलावाबाहेर काढला आणि त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,खुलताबाद येथे हलविण्यात आले. मात्र,वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.याबाबत खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनांची तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली
पुढील तपास पोलीस अंमलदार उत्तम खटके हे करीत आहेत.
